ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

ठाण्याचे आयुक्त ऑनफिल्ड! एका दिवसात 850 खड्डे बुजवले; बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाही सुनावले

ठाणे  ः गणपती दोन दिवसावर आल्यानंतरही शहरातील खड्डे बुजविण्यात येत नसल्याने महापालिकेवर चोहोबाजूने टिका होत होती. अशावेळी करोना विरोधातील आघाडी सांभाळत असताना महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा खडडयाची पाहणी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले होते. महापालिकेच्या अधिकाऱयांसह त्यांनी एमएसआरडीएच्या अधिकाऱयांनाही रस्त्यावर उतरण्यास भाग पाडल्याने आजापासून खड्डे बुजविण्याचा कामाला वेग आल्याचे दिसते आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांवरुन महापालिकेवर चांगलीच टिकेची झोड उठली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी सकाळी रस्त्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याचे आदेश दिल्यानंतर दुपारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आल्याचे दिसून आले. त्यानुसार अवघ्या एका दिवसात शहरातील विविध भागात रस्त्यांना पडलेल्या 1122 पैकी 856 खडडे पालिकेच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत.

या खडड्यावरुन महापैार नरेश म्हस्के यांनी थेट महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकऱ्यांना धारेवर धरुन संताप व्यक्त केला होता. तर विरोधक काॅंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. अशावेळी डाॅ. विपिन शर्मा यांनी शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट घरी बसविण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर खड्डे बुजविण्याच्या कामात हयगय करणाऱया ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचे आदेश दिले. त्यामूळेच एकच धावपळ होऊन खड्डे बुजविण्याचा कामाला अखेर सुरवात झाली. तसेच शहराच्या बाहेरील रस्त्यावरील खडडयालाही महापालिकेला जबाबदार धरत असल्याने एमएसआरडीएचे अधिकारी रस्त्यावर येईपर्यत आयुक्त रस्त्यावरच सुमारे तासभर थांबले होते. अखेर एमएसआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन खड्डे बुजविण्यच्या कामाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले.

बुधवारी दुपारपासूनच खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. यामध्ये बुधवारी तीन हात नाका, नितीन कंपनी ते लुईस वाडी सव्र्हीस रोड,  दालमिल नाका, एम्को कंपनी,  माजीवडा नाका, तीन हात फ्लाय ओवर ब्रीज, वागळे प्रभाग समितीतंर्गत कशीश पार्क या ठिकाणचे रस्ते युद्ध पातळीवर बुजविण्यात आले.       दरम्यान खड्डे बुजविण्याची ही मोहिम सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्यामध्ये हयगय झाल्यास कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खडय़ांचा सव्र्हे करण्यात आला आहे. 9 प्रभाग समिती अंतर्गत 1122 खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे 2345.85 चौरस मीटरचे होते. त्यातील 1482.43 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 856 खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरीत 863.42 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 32क् खड्डे दोन दिवसात बुजविले जातील असा दावा पालिकेने केला आहे. हे खड्डे डब्ल्युबीएम, कोल्डमिक्स, पेव्हरब्लॉक, कॉंक्रीटीकरणाद्वारे, डांबरीकरणाद्वारे बुजविण्याचे काम सुरु आहे.

---------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com