

Threatening calls
ESakal
ठाणे : शहरात आणखी एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून, पहिल्या घटनेत बिश्नोई ग्रुपकडून १० कोटींची मागणी करण्यात आली आहे, तर दुसऱ्या घटनेत पाच कोटींची मागणी करण्यात आली आहे, पण मागणी करणाऱ्याने आपली ओळख स्पष्ट केलेली नाही; मात्र पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी खंडणीविरोधी पथक पुढील तपास करत आहेत.