
वसई : घरातील मुलीचे स्वप्न थाटामाटात लावून देतात मुलगी संसाराची स्वप्न पाहते. परंतु या आनंदावर विरजण पडते आणि सरासरी होणाऱ्या जाचाला समोर जावे लागते. जानेवारी ते जून या सहा महिन्यात अशी एकूण ३४९ प्रकरणे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली असून महिन्याची सरासरी पाहता एकूण २१ महिलांचा छळ सासरी होत असल्याचे दिसून येते यातील अनेक प्रकरणाचा निपटारा समजोता करून करण्यात आला आहे.