

Thane Fraud Case
ESakal
ठाणे : काळी जादू, पूजा विधी आणि १२ ज्योतिर्लिंग यात्रेचे प्रलोभन दाखवून ठाण्यातील उच्चभ्रू गृहसंकुलामधील एका कुटुंबाची एक कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडला असून याप्रकरणी मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.