ठाणे : कोलशेत परिसरात ‘टकला अंकलने पाईप लावला आहे’ असे लहान मुलाने म्हटल्यामुळे शेजाऱ्याने नऊ वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे कोलशेत परिसरात ४ मार्चला सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अनिलकुमार गुप्ता यांनी घराबाहेर असलेल्या आपला मुलगा धुव्र (९) याला बाहेरील नळाला पाईप कोणी लावला आहे का, अशी विचारणा केली. त्यावर मुलाने टकला अंकलने पाईप लावला आहे, असे उत्तर दिले. ही बाब शेजारी राहणारे राकेश मुत्तल (२३) यांच्या कानावर गेली. त्या वेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती..Mumbai News: सात हजार कोटी खर्च, तरी नद्यांचे पुनरुज्जीवन अपूर्णच; पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह.दरम्यान, रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास गुप्ता घरी परतल्यानंतर राकेश मुत्तल हे त्यांच्या घरी आले आणि धुव्र याला बाहेर बोलावले. मुलगा बाहेर आल्यानंतर त्याच्या श्रीमुखात लगावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलगा मोठ्याने रडू लागल्याने गुप्ता यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करीत ‘जिथे मुलगा दिसेल तिथे पुन्हा मारेन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे..याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय कायदा २०१५च्या कलम ७५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३५२, ३५२ (२) आणि ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजूषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षकांचा मनमानी कारभार; अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नोकरीला रामराम, नागरिकांचाही तीव्र संताप.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.