Thane Dahi Handi 2025 : मुंबईसह ठाणे आणि देशाच्या विविध भागांत आज शनिवार, १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. पारंपारिकरीत्या हा उत्सव भाद्रपदातील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला साजरा केला जातो..आज (१६ ऑगस्ट) मुंबई-ठाण्यातील प्रत्येक गल्लीबोळात ‘गोविंदा आला रे आला’चे स्वर गुंजत आहेत. विविध गोविंदा पथके थर लावून दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी दाखल होत आहेत. यावेळी २०२५ मधील पहिला ऐतिहासिक विश्वविक्रमही नोंदवला गेला आहे..भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'.जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी उत्सवात यंदा १० थरांची भव्य मानवी रचना उभारून विक्रम प्रस्थापित केला. या यशानंतर प्रताप सरनाईक यांनी पथकाचे अभिनंदन करत मोठा आनंद व्यक्त केला. दरम्यान, मागील वर्षी याच जागी जय जवानचं पथक थर लावताना कोसळलं होतं. .दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांच्या नेत्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. जन्माष्टमीनिमित्त भाजप, शिवसेना, शिवसेना उबाठा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि इतर अनेक संघटना व नेत्यांनी मुंबई-ठाण्यात कोट्यवधींच्या बक्षिसांसह दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे..CM Nitish Kumar : '5 वर्षात एक कोटी तरुणांना देणार सरकारी नोकऱ्या'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा.ठाण्यात विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून हे बक्षीस संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाही ठाण्यात दहीहंडीच्या थरांचा थरार, उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.