esakal | ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभायारण्यामुळे उपनगरातील विकासाला खीळ ?
sakal

बोलून बातमी शोधा

flamingo

ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभायारण्यामुळे उपनगरातील विकासाला खीळ ?

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : ठाणे खाडीतील प्लेंमिंगो अभायरण्यामुळे (flamingo sanctuary) उपनगरातील विकासाला (developments) मर्यादा येण्याची शक्यता आहे. अभयारण्याच्या १० किलोमिटरचा परीसर बफर झोन (buffer zone) ठरविण्यात आलेला असल्याने या भागात विकासाची कामे (development works) करण्यासाठी केंद्रीय वन्यजिव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. याचा परीणाम मुंबईतील किमान १५ विभागांनवर होण्याची शक्यता आहे. ( Thane Devolvement works may in trouble due to flamingo sacntury-nss91)

महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने या बाबत एक परीपत्रक प्रसिध्द केले आहे.‘बफर झोन मधील भागात कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.त्यानंतर बांधकामाच्या आराखड्याला पालिकेकडून मंजूरी दिली जाणार आहे.याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय वन्यजिव मंडळाकडून घेतला जाणार आहे. या परीपत्रकामुळे मुंबईच्या बांधकामावर परीणाम होणार आहे.आता विमानतळ प्राधिकरण,संरक्षण विभाग यांचे नियम आहेच.त्यात आता हा नवा नियम येत असेल तर पुनर्विकासालाही फटका बसणार आहे.मुंबईचा १०० वर्षांपासून विकास होत आहे.त्यात,असा नियम आल्यास त्यांचा परीणाम पुर्ण शहरावर होऊ शकतो.१० किलोमिटर हा आकडा कागादावर लहान दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याचा परीणाम मोठा आहे असे बिल्डर असोसिएशनचे आनंद गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा: BMC : स्थानिकांचे लसीकरण वाढवण्यासाठी 'हा' नवीन प्लॅन

गृहनिर्माण प्रकल्प उभारताना त्यात पर्यावरणाचा विचार होणे गरजेचे ओ.बफर क्षेत्रातील जलस्त्रोतांचे पाणथळ जागांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.परवानगी घेऊन बांधकाम करणे म्हणजे बांधकाम करुच नये असा अर्थ होत नाही.त्यामुळे यात अडचणी काही नसतील अशी भुमिका पर्यावरण प्रेमी मांडत आहेत.

नक्की काय झाले राज्य सरकारने काय केले

२०१८ च्या सर्वेच्च न्यायालयाच्या निकालानुसार अभायरण्याच्या १० किलोमिटर परीसरात बफर झोन ठरविण्यता आला आहे.त्यावर ही मर्यादा ३.८९ किलोमिटर पर्यंत आणावी असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.त्यावर केंद्र सरकारने सुचना व हरकती मागवल्या आहेत.

या विभागांना बसणार फटका

-लालबाग परळ,शिव वडाळा माटूंगा,दादर पुर्व ,कुर्ला,चेंबूर,मानखुर्द,घाटकोपर पुर्व,विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप,मुलूंड,कांदिवली,बोरीवली,दहिसर, अंधेरी पुर्व,वांद्रे पुर्व

loading image
go to top