ठाणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; तुमच्या परिसराचा समावेश तर नाही ना?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेने जिल्हयातील क्षेत्र सीमांकित करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ठाणे जिल्हयातील सर्व 6 महापालिका,  2 नगर परिषदा,  2 नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

ठाणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेने जिल्हयातील क्षेत्र सीमांकित करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. ठाणे जिल्हयातील सर्व 6 महापालिका,  2 नगर परिषदा,  2 नगरपंचायती तसेच ग्रामीण भागासाठी हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. 17, एप्रिल 2020 च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.3  (i) व (ii) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे आदेश दिले.

ही बातमी वाचली का? जव्हारच्या मिरचीचा तडका एपीएमसीत 

उपरोक्त प्रतिबंधित क्षेत्रामध्ये  17 एप्रिल, 2020 रोजी शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती लागु राहणार नाहीत. या बाबींवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागु राहतील. या सर्वाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,  2005 मधील कलम 51 व 56,  भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम,  1897 व भारतीय दंड संहिता,  (45 ऑफ 1860) कलम 188 या सर्वांनुसार दंडनीय व  कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नार्वेकर यांनी दिला आहे.

ही बातमी वाचली का? पालिका म्हणते! वाजवा रे वाजवा, पण परवानगी घेऊन...

प्रतिबंधित क्षेत्र
ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. तसेच अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र, शहापूर, मुरबाड नगरपंचायतीचे संपूर्ण क्षेत्र देखील प्रचिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर कऱण्यात आले आहे. याशिवाय ठाणे जिल्हा परिषदेचे संपूर्ण क्षेत्राचा (ठाणे ग्रामीण) देखील प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane district declared restricted area due to corona