esakal | ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Haribhau mhatre

ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : ठाणे (Thane) जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे (haribhau mhatre) यांचे आज निधन झाले . निधन समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते त्यांच्या मागे एक मुलगी एक मुलगा ,जावा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा: ...आणि ती पुन्हा गाऊ लागली; २४ वर्षीय तरुणीची जिभेच्या कर्करोगावर यशस्वी मात

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे ते बरेच वर्ष अध्यक्ष होते. तसेच त्यांनी ठाणे आणि पालघर मध्ये ग्रंथालय चळवळीला चालना दिली होती. ते ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष होते. कल्याणकारी जेष्ठ नागरिक संघ वसई पूर्व याचे ते माजी अध्यक्ष होते.ते दरवर्षी आपल्या घरी असलेल्या गणेशोत्सवात कवी संमेलन घेणारे. एक साहित्यीक प्रेमी अशी त्यांची ओळख होती.

हरिभाऊ म्हात्रे यांनी पालघर जिल्ह्यातील बरेच ठिकाणी ग्रंथालय स्थापन करुन मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे. वसई तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करून विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. वसईतील अण्णा साहेब वर्तक महाविद्यालयावरहि ते काम करत होते.सोमवनशी क्षत्रिय समाजाच्या जेष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा एक मोठा कार्यकर्ता गेला असून ग्रंथालय चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे.

loading image
go to top