esakal | ...आणि ती पुन्हा गाऊ लागली; २४ वर्षीय तरुणीची जिभेच्या कर्करोगावर यशस्वी मात
sakal

बोलून बातमी शोधा

Cancer patients treatment

...आणि ती पुन्हा गाऊ लागली; २४ वर्षीय तरुणीची जिभेच्या कर्करोगावर यशस्वी मात

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : जिभेच्या कर्करोगाने (Tongue cancer) त्रस्त असलेल्या २४ वर्षीय तरुणीवर मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल (Wockhardt Hospital) येथे यशस्वी उपचार करण्यात आले. सल्लागार ऑटोलार्यनगोलॉजिस्ट आणि हेड अॅण्ड नेक ऑन्को सर्जन डॉ. चंद्रवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Tough Surgery) यशस्वीरीत्या (success) पार पडली. रेडिओथेरपी तसेच केमोथेरपीच्या साह्याने यशस्वी उपचार करण्यात आले. जी तरुणी जिभेच्या उजव्या बाजूस असलेल्या ४.५ सेंटीमीटरच्या व्रणामुळे बोलू शकत नव्हती, खाऊ शकत नाही ती आता सहजपणे या साऱ्या गोष्टी करत असून विशेष म्हणजे तिला असलेली गायनाची (singing) आवडदेखील तिला जोपासता येत असून आता ती पूर्वीसारखी गाऊ लागली आहे.

हेही वाचा: कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली

मिरा रोड येथे राहणाऱ्या २४ वर्षीय इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीच्या जिभेवर व्रण, तोंड दुखणे, बोलण्यास असमर्थता, जेवताना तसेच गिळताना त्रास होणे अशा समस्या सतावू लागल्या होत्या. तिने अनेक मोठ्या रुग्णालयांना भेट दिली. तसेच घरगुती उपचारांचा आधार घेत अल्सरवर मध लावणे, कोरफडीचा रस घेणे यासारखे अनेक घरगुती उपाय केले; परंतु त्याचा काही फारसा फरक पडला नाही. जसजसा वेळ निघून गेला तसतसा तिचा त्रास आणखी वाढू लागला.

वोक्हार्ट हॉस्पिटलचे सल्लागार प्रमुख आणि ऑन्को सर्जन डॉ. चंद्रवीर सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रुग्ण तरुणी जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती, तेव्हा तिला तोंडात आतल्या बाजूस दुखणे, खाण्यास असमर्थता, बोलणे किंवा गिळणे या क्रिया करण्यात येणाऱ्या अडचणी आणि जिभेच्या उजव्या बाजूस ४.५ सेमी व्रण यासारख्या तक्रारी होत्या. तिच्या अल्सर, एमआरआय, एक्स-रे आणि सीटी स्कॅन तपासणीच्या बायोप्सीमध्ये कर्करोगाची वाढ दिसून आली ती जिभेपासून ते मानेच्या उजव्या बाजूच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरली होती. जिभेच्या कर्करोगाला तोंडाचा कर्करोग म्हणूनही संबोधले जाऊ शकते.

हेही वाचा: कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली

कर्करोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, रुग्णाला रेडिओथेरपी आणि केमोथेरपी देण्यात आली. या उपचार प्रक्रियेत जीभ आणि शेजारच्या ऊतींच्या उजव्या बाजूचा अर्धा भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान काढलेल्या ऊतींच्या जागी त्वचेचे कलम केले जाते. संपूर्ण शस्त्रक्रिया पाच तासात पूर्ण झाली. रुग्णाला सहा दिवसांनी घरी सोडण्यात आले. आता ती पूर्वीसारखी खाऊ शकते, बोलू शकते आणि अन्न गिळू शकते.

लॉकडाऊनमध्ये मला जिभेवर एक व्रण आला. ज्यामुळे मला खाण्यापिण्यात अडचणी येऊ लागल्या. मसालेदार पदार्थ खाल्यावर मला अधिक त्रास होऊ लागला. बोलताना अनेक अडचणी येऊ लागल्या. मला गायनाची आवड असून अल्सर आणि वेदनांमुळे मी माझी आवडती गाणी गाऊ शकत नव्हते. जिभेच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र वोक्हार्ट हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरांच्या टीमने केलेल्या यशस्वी प्रयत्नानी मला पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जिभेवर व्रण किंवा मौखिक आरोग्याबाबत कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच तपासणी करा, अशी प्रतिक्रिया रुग्ण तरुणीने व्यक्त केली.

loading image
go to top