

Thane Drug Reizure
sakal
ठाणे : कोकेन, गांजा, चरस, एमडी पावडर, कफ सिरप बॉटल्स, नशेच्या गोळ्यांसह विविध अमली पदार्थांचा काळा धंदा ठाण्यात तेजीत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. या पदार्थांचा वेढा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असून, तरुणाईमध्ये वाढते सेवन चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे ठाण्याला अमली पदार्थमुक्त बनवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे.