
ठाण्यात पिता-पुत्र जोडीकडून 5.93 कोटींची वीजचोरी; गुन्हा दाखल
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भागात 5.93 कोटींची वीजचोरी केल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) च्या पथकाने 5 मे रोजी फाळेगाव येथील एका स्टोन क्रशिंग युनिटवर छापा टाकल्यानंतर ही अनियमितता उघडकीस आली.
मीटर रीडिंगमध्ये छेडछाड करणार्या गॅझेटचा वापर करून वीज चोरी केली जात होती. गेल्या 29 महिन्यांत एकूण 34,09,901 युनिट्सची वीजचोरी केल्याचे समोर आले आहे. या विजेची किंमत 5.93 कोटी इतकी असल्याचा अंदाज आहे, असल्याचे अधीकाऱ्यांनी सांगितले.
चंद्रकांत भांबरे आणि त्यांचा मुलगा सचिन यांच्यावर विद्युत कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुरबाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.
Web Title: Thane Father Son Duo Steal 3409901 Units Power Worth Rs 593 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..