राजकारण न करता 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी | Eknath shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

"राजकारण न करता 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी"

डोंबिवली : ठाणे जिह्यातील (thane) 14 गावे विकासापासून (village developments) गेली अनेक वर्षे वंचित आहेत. ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत (navi Mumbai municipal corporation) समाविष्ट व्हावीत अशी 14 गाव सर्व पक्षिय विकास समितीची मागणी आहे. त्यासाठी केलेले ठराव, प्रशासकीय यंत्रणांना केलेले पत्रव्यवहार पहाता ही गावे नवी मुंबईत (navi mumbai) जाण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून समिती सदस्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेण्याचा प्रयत्न करीत होते मात्र ती भेटही होत नव्हती.

हेही वाचा: फरार...! परमबीर सिंगाच्या घरावरचा आदेश वाचला का?

अखेर सोमवारी समिती सदस्य आणि मंत्री शिंदे यांची भेट झाली आहे. यावेळी गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून नागरिकांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी समितीने शिंदे यांच्याकडे केली आहे. 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून 14 गाव सर्व पक्षिय विकास समिती पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी 14 गावातील ग्रामपंचायत निवडणुकांवर देखील स्थानिकांनी तीनदा बहिष्कार टाकला आहे.

मात्र जनतेच्या मागण्या या शासन दरबारी धूळखात पडल्या आहेत. मागण्या मान्य होत नसल्याने समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागत होती. मात्र त्यांना वेळच दिली जात नसल्याने समिती सदस्यांचे म्हणने आहे. अखेर सोमवारी समितीचे शिष्टमंडळाने पालकमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ करावी याविषयी निवेदन दिले.

तसेच गावात भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. तसेच कोणतेही राजकारण न करता गावच्या विकासासाठी ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत असे समितीने निवेदनात म्हटले आहे.

"सोमवारी समिती मंडळाने पालकमंत्री शिंदे यांची भेट घेत गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे. पालकमंत्र्यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. "

- लक्ष्मण पाटील, अध्यक्ष 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती

loading image
go to top