

Thane Hotel Owners Protest
ESakal
ठाणे : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन आणि व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर झाला आहे. त्याचा फटका आता हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. गॅसटंचाई आणि वापरावरील निर्बंधांमुळे ठाणे शहरातील सुमारे ५० ते ६० टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी एकत्र येत चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन केले.