esakal | ...माणसात "देव' पाहिला! 
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्तांना गणेशमूर्ती देताना योगेश कुडाळकर, संभाजीराव चव्हाण.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आयुष्यभर कमावलेली पुंजी पाण्यात गेली आहे. केवळ घरांचे वासे आणि भिंती उरल्या आहेत. पूरग्रस्तांना यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याइतपत पैसा हातात राहिला नाही. पूरग्रस्तांची आर्थिक निकड लक्षात घेऊन ठाण्यातील करसल्लागार योगेश कुडाळकर आणि मूर्तिकार सचिन कुंभार यांनी अनेक गावांमध्ये मोफत गणेशमूर्ती घरपोच दिल्या आहेत. 

...माणसात "देव' पाहिला! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली होती. या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आयुष्यभर कमावलेली पुंजी पाण्यात गेली आहे. केवळ घरांचे वासे आणि भिंती उरल्या आहेत. पूरग्रस्तांना यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याइतपत पैसा हातात राहिला नाही. पूरग्रस्तांची आर्थिक निकड लक्षात घेऊन ठाण्यातील करसल्लागार योगेश कुडाळकर आणि मूर्तिकार सचिन कुंभार यांनी अनेक गावांमध्ये मोफत गणेशमूर्ती घरपोच दिल्या आहेत. 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा जबरदस्त फटका बसला. या महापुरामुळे अनेकांचे संसार "होत्याचे' नव्हते झाले आहेत. केवळ सरकारी मदत आणि सामाजिक संस्थेच्या आधारामुळे अनेकांची जगण्याची धडपड सुरू आहे. महापुरानंतर सावरण्यासाठी पूरग्रस्तांकडे पैसाही शिल्लक नसल्याने दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत सुरू आहे. त्यात गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना घरी गणेश प्राणप्रतिष्ठा करण्याइतपत पूरग्रस्तांची ऐपत राहिली नाही. 

पूरग्रस्तांचा जगण्यासाठीचा संघर्ष लक्षात घेऊन ठाण्यातील करसल्लागार योगेश कुडाळकर आणि मूर्तिकार सचिन कुंभार यांनी पूरग्रस्तांना मोफत गणेशमूर्ती घरपोच देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ठाण्यात राहत असलेल्या मात्र सांगली जिल्ह्यातील संभाजीराव चव्हाण यांची मदत घेतली. संभाजीराव यांनी त्यांच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक मित्रांशी संपर्क साधून महापुरामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या गावांची माहिती जाणून घेतली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी, इंगली, खिदरापूर, आळास, जुगूल आणि शिरोळ तालुक्‍यात त्यांनी गणेशमूर्ती घरपोच दिल्या आहेत. 

श्रद्धेच्या भावनेतून सेवा 
गेल्या 24 वर्षांपासून गणेशमूर्तीची मोफत वाहतूक आपल्या गाडीतून करण्याचे व्रत योगेश कुडाळकर यांनी स्वीकारले आहे. गणेशाविषयी असलेल्या अतूट श्रद्धेच्या भावनेतून त्यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा मारुती 800 गाडीतून गणेशाच्या मूर्ती नेण्यास सुरुवात केली. या वर्षी त्यांनी 21 हून अधिक गणेशमूर्ती घरपोच पोहोचविल्या आहेत. 

कोट 
पूरग्रस्त भागात प्रत्येकाच्या घरी जाऊन गणेशमूर्ती दिल्या आहेत. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमच्या कामाचे सार्थक झाल्याचे वाटले. गणेशमूर्तीसोबतच सजावटीचे साहित्य, मिठाईचीही भेट दिली. 
- योगेश कुडाळकर, करसल्लागार, ठाणे 

loading image
go to top