ठाणेकरांनो 'जांभळी नाका भाजी मार्केट' आता शिफ्ट होणार 'या' ठिकाणी

ठाणेकरांनो 'जांभळी नाका भाजी मार्केट' आता शिफ्ट होणार 'या' ठिकाणी

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यातील जांभळी नाका येथील भाजी मंडई येथील 400 भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांना सेंट्रल मैदानात येत्या बुधवारपासून म्हणजेच १ एप्रिलपासून स्थलांतरित करण्यात येणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 10 वाजेपर्यंतच हे भाजी मार्केट सुरु राहणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेने दिली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पाळण्यात येणार आहे. 

जांभळी नाका ते स्टेशनपर्यंत आणि जांभळी नाक्‍यावरील दोन भाजी मंडईत होणारी गर्दी ही रोजचीच आहे. नागरीकांना कितीही सोशल डिस्टंसिंग पाळा असं आवाहन करण्यात आलं असलं तरी नागरिक ऐकत नसल्याचेच दिसत होते. त्या पाश्वभूमीवर सोमवारी सकाळी ठाणे येथील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यापारी, याबरोबर महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला, ठाणे नगर पोलिस, ठाण्याचे वरीष्ट पोलिस निरिक्षक सोमवंशी आदींची एक बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोनाच्या पाश्वभूमीवर खबरदारी म्हणून हा उपाय पुढे आलाय.

त्यामुळे जांभळी नाका इथल्या भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरुपात सेंट्रल मैदान येथे स्थलांतर करंण्यावर एकमत झालंय. त्यानुसार आता येत्या बुधवार म्हणजेच १  एप्रिल पासून ठाण्यातील  सेंट्रल मैदानात 400 भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर व्यापारी आपल्या व्यावसाय करणार आहेत. 

पहाटे पाच ते सकाळी 10 या वेळेतच सेंट्रल मैदानातील तात्पुरत्या मार्केटमध्ये व्यवसाय करता येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन देखील महानगरपालिकेने केले आहे. 

thane jambhli naka vegetable market will temporary shift to central ground 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com