

Shiv Sena Shinde Faction Strengthens Hold in Kalyan Dombivli
Sakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आपली ताकद सातत्याने दाखवत असून, आता या विजयाला घरातून मिळालेल्या पाठबळाचा राजकीय अँगलही लाभला आहे. प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे बिनविरोध विजयी झाले असून, ते कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांचे पुत्र असल्याने या विजयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.