

Thane Traffic Alert: Kasarvadavali Road Restrictions To Continue Till 2027
esakal
ठाणे: ठाणे वाहतूक पोलिसांनी कासारवडवली परिसरात महत्त्वाची वाहतूक बंदी जाहीर केली आहे. बोरिवली बोगदा प्रकल्पाच्या कामामुळे ही तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हिलक्रेस्ट सोसायटी, मुल्ला बाग ते नीलकंठ ग्रीन या मार्गावर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.