esakal | Bandh: शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Bandh: शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण

Bandh: शिवसेनेची दादागिरी! उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना दांडक्यानं मारहाण

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महा विकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. मात्र, ठाण्यातून एक असा व्हिडीओ समोर येतोय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. ठाण्यातील शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करुन त्या बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बंदमुळे टीएमटीची सेवा बंद आहे, त्यामुळे लोकांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम रिक्षाचालक करत आहेत. मात्र, बंद पुकारला असतानाही रिक्षा चालवत असल्याच्या कारणावरुन स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होतो आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र बंदवरून भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

रिक्षा जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न

ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे पाहायला मिळाले. केवळ रिक्षाच सुरु असल्याने बंद पूर्णपणे यशस्वी कारण्यासाठी शिवसैनिकही यावेळी आक्रमक झाले. जांभळी नाका परिसरात रिक्षाचालकांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा: केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करावी, नाना पटोलेंची मागणी

बंदसाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असल्याने ठाण्यात या बंदच्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले. महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले . यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले . दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

loading image
go to top