esakal | Breaking : खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्याातील गाडीला आग

बोलून बातमी शोधा

Breaking : खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्याातील गाडीला आग}

ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखीत अंगरक्षकांनी इतर गाड्या त्वरीत बाजूला गेल्याने मोठी हानी टळली.

Breaking : खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्याातील गाडीला आग
sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील एका कार्यक्रमानिमित्त शहाड येथे आले होते. खासदार पाटील हे कार्यक्रमानिमित्त कार्यालयात गेले असताना ताफ्यातील गाड्या कार्यालयाच्या बाहेर उभ्या होत्या. दरम्यान ताफ्यातील स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखीत अंगरक्षकांनी इतर गाड्या त्वरीत बाजूला गेल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन दलाच्यावतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आग नेमकी कशाने लागली हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. 

मुंबई, पालघर, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शहाड येथील भाजपच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटीदार कार्यालयात खासदार कपिल पाटील हे आले होते. कार्यक्रमादरम्यान रस्त्यावर खासदारांच्या ताफ्यातील गाड्या कार्यालयाबाहेर उभ्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास ताफ्यातील अंगरक्षकांसाठी वापरल्या जाणाऱ्या एका गाडीला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. कार्यक्रमासाठी खासदारांसह ताफ्यातील कार्यकर्ते कार्यालयात गेल्याने मोठा अनर्थ टळला.

-----------------------------------

thane marathi latest MP Kapil Patils convoy caught fire live update