esakal | ठाणे RTO प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल आल्यावर कारवाईची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे RTO प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल आल्यावर कारवाईची शक्यता

रस्ता सुरक्षा अभियान सुरू असतांना कार्यालयीन वेळेत परिवहन मंत्र्यांनी अचानक भेट देऊन ठाणे आरटीओ कार्यालयाची झाडाझडती घेतली होती.

ठाणे RTO प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल आल्यावर कारवाईची शक्यता

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : रस्ता सुरक्षा अभियान सुरू असतांना कार्यालयीन वेळेत परिवहन मंत्र्यांनी अचानक भेट देऊन ठाणे आरटीओ कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. दरम्यान खुद्द आरटीओ रवी गायकवाड स्वतः गैरहजर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गायकवाड यांच्या नियमित अनुपस्थितीच्या तक्रारी आणि नागरिकांच्या तक्रारीवरून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सकाळ शी बोलतांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील आरटीओ रवि गायकवाड यांना परिवहन आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी गेल्या महिन्यात साध्या वेशात ओळख लपवून ठाणे आरटीओ कार्यालयाला भेट दिली होती. दरम्यान नागरिकांना अनेक समस्या होत असल्याचे आढळून आले त्यासोबतच चक्क आरटीओ अधिकारीच कार्यालयातून बेपत्ता असल्याचे उघड झाले होते. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरटीओ कार्यालयात कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांसाठी मदत केंद्र नसून, आरटीओ अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या समस्यांना योग्य उत्तर दिल्या जात नाही. तर फिटणेस तपासणी साठी आलेल्या वाहनांचे वेळेवर फिटणेस होत नसल्याने, रुग्णवाहीकांना सुद्धा तात्कळत राहावे लागते आहे. अशा अनेक तक्रारी परिवहन मंत्र्यांना यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामूळे 29 जानेवारी रोजी मंत्र्यांनी ठाणे आरटीओ कार्यालयाला अचानक भेट देऊन ठाणे आरटीओची झाडाझडती घेतली होती. 

लवकरच कारवाईची शक्यता
परिवहन आयुक्तांना या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आतापर्यंत आरटीओ गायकवाड आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे. मात्र, गायकवाड यांनी यासंदर्भात आपला खुलासा देण्यासाठी परिवहन आयुक्तांकडून वेळ वाढवून घेतला आहे. गायकवाड यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Thane marathi news RTO case under investigation anil parab said latest updates