ठाणेकरांची चिंता वाढली, जिल्ह्यात 'या' वयोगटातील सर्वाधिक रुग्ण

ठाणेकरांची चिंता वाढली, जिल्ह्यात 'या' वयोगटातील सर्वाधिक रुग्ण

मुंबई- ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्यावाढ अद्याप कायम आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ११ हजार ७०५ रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता पाहून प्रशासनाची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून शहरात दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत. 

त्यापैकी ५ हजार ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित ६ हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांमधील ४० टक्के रुग्ण हे ३१ ते ५० वयोगटातील आहेत. तर ५० वर्ष वयापेक्षा पुढील ३७ टक्के रुग्ण आहेत.  एकूण रुग्ण संख्येमध्ये पुरुष रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर शहरात आतापर्यंत चारशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ५० वयोगटाच्या पुढील २८९ रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांचे वयोगटानुसार महापालिका प्रशासनानं हे  विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणानुसार कोरोनाची लागण होण्यामध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वयोगटानुसार रुग्णसंख्या

वयोगट  पुरुष     महिला     टक्केवारी      मृत्यू
         
१० वर्षां पर्यंत   १४६   १२७  २.३
११ ते २०  २४६   २१०  ३.९   १
२१ ते ३०    १०८१     ८१७ १६.२  १०
३१ ते ४०    १५७२    ७९०    २०.२ २५
४१ ते ५०      १४८६  ८५७   २०  ७२
५१ ते ६०          १४७७  ८२१   १९.६ १०९
६० वर्षांच्या पुढे   १२६२  ८०३  १७.६  १८०

thane municipal corporation covid 19 patient age group

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com