

ठाणे: एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून हालचाली सुरू असून मुख्यमंत्र्यांनीदेखील मराठी भाषेचा शासकीय कार्यालयात वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असताना, दुसरीकडे ठाणे महापालिकेत यापुढे मराठी भाषेतून ‘एमए’ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ राबविणाऱ्या ठाणे पालिकेला मराठी भाषेचे वावडे का, असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जात आहे.