esakal | ठाणे महापालिका यासाठी खर्च करणार 4 कोटी 93 लाख रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे महापालिका यासाठी खर्च करणार 4 कोटी 93 लाख रुपये

स्मार्ट सिटी दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहरात अजून एक पार्क बांधण्याची तयारी करण्यात आली आहे. 

ठाणे महापालिका यासाठी खर्च करणार 4 कोटी 93 लाख रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : स्मार्ट सिटी दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहरात अजून एक पार्क बांधण्याची तयारी करण्यात आली आहे. घोडबंदर रोड येथे महापालिकेच्या वतीने तब्बल चार कोटी 93 लाख 35 हजार 517 रुपये खर्च करून बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी पुढील सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. स्मार्ट सिटी झाल्यानंतर शहरात काही आकर्षक स्थळे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातूनच खाडी किनारच्या अनेक भागांचाही पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला जात आहे. 

घोडबंदर परिसरातील वाघबिळ येथे हिल स्प्रिंग इमारतीसमोरील उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार या ठिकाणी नॉलेज पार्क, प्लॅनेट झोन, सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी झोन, लाफिंग झोन (अंब्रेला), चेस झोन, क्वीझ झोन, स्पीकर कॉर्नर, योगा एरिया, वॉटर फाऊंटन, नो युवर मदरलॅण्ड, स्टोरी रीडिंग एरिया, बर्डस्‌ ऍण्ड ऍनिमल झोन, ऍक्‍युप्रेशर वॉकिंग ट्रॅक, सोलर पार्क, सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड, चिल्ड्रन प्ले झोन, रेन्बो गार्डन, नॉलेज प्लॅटफॉर्म, स्पोर्टस्‌ ऍण्ड जीम इक्विपमेंट, शौचालय, पाणपोई, सेवा कक्ष, फूड काऊंटर, पाथवे, सिंचन व्यवस्था, प्रवेशद्वार, लॅण्ड स्केस, संरक्षक भिंत, कमानी, फर्निचर आदी कामे केली जाणार आहेत.

ही बातमी वाचा ः ठाणे पालिकेत सत्ताधारी, प्रशासन आमने-सामने

या कामासाठी चार कोटी 93 लाख 35 हजार 517 रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे; मात्र शहरातील काही मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी काही नगरसेवकांना निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे एका थीम पार्कवर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याच्या प्रशासनाच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून जोरदार टीका होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

यापूर्वीच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप 
यापूर्वी थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कच्या कामाबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. तसेच ठरलेल्या नियमानुसार ही कामेही करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची वेळ आली आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. अर्धवट असलेल्या बॉलीवूड पार्कच्या कामाचे पैसेही ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे काम बंद करण्याची मागणी महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वारंवार केली आहे. त्यामुळे शहरातील एकूणच थीम पार्कच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. अशा वातावरणात पुन्हा नव्याने थीम पार्कची तयारी करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

loading image