ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू

ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू



ठाणे : कोव्हीड बाधित रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम तयार केली आहे. त्यासाठी www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड 19 बाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता कॅाल सेंटरही कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या ॲपचे अनावरण झाले होते. ही प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी आणि प्रत्येक गरजू रूग्णांस बेड उपलब्ध व्हावा अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला.

 महापालिकेने बनविलेल्या www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक उघडल्यानंतर रूग्णांना आवश्यक ती माहिती वेबलिंक द्वारे उपलब्ध करून दिलेल्या फॅार्मवर भरून सादर करावी लागणार आहे. ती माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होईल. रूग्णाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या रूग्णांस क्लिनिकल स्टेटसनुसार कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोव्हिड हॅास्पीटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जाईल. 

त्याचबरोबर रूग्णाने रूग्णावाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती ॲम्ब्युलन्स टीमकडे जाईल. त्यानंतर सबंधित रूग्णांस सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रूग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येईल. रूग्णांच्या मागणीनुसार त्यास कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोवीड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोव्हिड हॅास्पीटल यापैकी कोठे दाखल करावयाचे आहे त्यानुसार दाखल करण्यासाठी रूग्णावाहिका उपलब्ध करून देण्यात येईल.

 या रूग्ण रूग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेला ओटीपी क्रमांक विचारण्यात येईल तो ओटीपी क्रमांक दिल्यानंतर रूग्णांस संबंधित रूग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येईल. आणि तसा अहवाल कोविगार्ड डॅशबोर्डच्या माध्यमातून संबंधित रूग्णालयासही कळविण्यात येईल. याबाबतची कार्यपद्धती या वेबलिंकवर देण्यात आली आहे.

या क्रमांकावर होणार शंकांचे निरसन
दरम्यान शहरामधील नागरिकांचे कोवीड 19 बाबतीत शंकाचे निरसन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोवीड कॅाल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅाल सेंटरशी संपर्क साधण्यासाठी 8657906791, 8657906792, 8657906793, 8657906794, 8657906795, 8657906796, 8657906797, 8657906798, 8657906801, 8657906802 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

thane Municipal's online bed allocation system weblink launched The call center is also operational to resolve Corona's suspicions

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com