Murbad Mhasa Yatra
ESakal
मुंबई
Thane News: मुरबाडची ‘म्हसा यात्रा’ ३ जानेवारीपासून! कोट्यवधींची उलाढाल; चोख पोलीस बंदोबस्त अन् ड्रोनची नजर
Mhasa Yatra: ठाणे जिल्ह्यातील ‘मुरबाड-म्हसा यात्रा’ ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि २२६ वर्षांची प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभलेली ‘मुरबाड-म्हसा यात्रा’ ३ जानेवारीपासून सुरू होत आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर भरणारी ही यात्रा राज्यातील ग्रामीण जीवन आणि अर्थकारणाचा अविभाज्य भाग मानली जाते. १० दिवस चालणाऱ्या या यात्रेत यंदाही कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित असून, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

