

Trailer stuck in arch in Dombivli
ESakal
डोंबिवली : शहरात सण-उत्सव आणि राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या कमानींमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. डोंबिवली पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या लोककला दशावतार नाट्य महोत्सवाच्या कमानीत सोमवारी एक मोठा ट्रेलर अडकला, त्यामुळे काही वेळ संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या आधीही शहरात कमानीमुळे वाहतूक अडथळा, कमानी पडून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. तरी या कमानी उभारताना पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस कोणतेही नियम घालताना दिसत नाहीत.