

ruta awhad
esakal
ठाणे, ता. १५ : आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक व माजी महापौर मिलिंद पाटील यांच्यासह नऊ नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षांतरामुळे कळवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड गटाने पक्ष सोडलेल्या उमेदवारांच्या प्रभागात तगडे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे.