Pension
sakal
ठाणे - महिन्याची सुरुवात होताच पेन्शन खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ठाणे जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या वेळबद्ध पेन्शन वितरण प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील २ हजार २५० पेन्शनधारकांच्या खात्यावर १ ऑक्टोबरलाच पेन्शन जमा करण्यात आली. राज्यातील ठाणे, सातारा आणि नागपूर जिल्ह्यांत हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात राबविला जात आहे.