डान्सबार, हुक्का पार्लरमुळे ठाणे पोलीस अडचणीत

गृहमंत्र्यांचे सचिवांना कार्यवाहीचे निर्देश
dance bar
dance barsakal media

ठाणे : ठाणे शहरात रात्रभर कोणतेही डान्स बार, हुक्का पार्लर (Dance bar) सुरू असलेले आढळून आलेले नाहीत, असा खुलासा देणे ठाणे पोलिसांच्या (Thane Police) अंगलट येणार आहे. याप्रकरणी आमदार संजय केळकर (sanjay kelkar) यांनी गृहमंत्र्यांकडेच थेट तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश गृह सचिवांना (Home secretary) दिल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. तसेच यासंबंधीचे सर्व पुरावेही आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

dance bar
रामबागमधील रहिवाशी मतदानावर बहिष्कार घालणार; सदोष प्रभाग रचना केल्याचा आरोप

ठाण्यात कोरोना काळातही रात्रभर डान्स बार, हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसाय सुरू आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध चित्रफितींच्या आधारे ठाणे पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, शहरात बेकायदेशीरपणे रात्रभर असे धंदे सुरू असल्याचे आढळून आलेले नाही, असा लेखी खुलासा पोलिसांनी केला आहे. असे असले तरी या धंद्याचे पुरावे समाज माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.

यावर कारवाई होणे जनतेला अपेक्षित असताना तक्रार करणाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. यासंबंधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना लेखी कळवून केळकर यांनी कारवाईची मागणी केली होती. गृहमंत्र्यांनी गृह सचिवांना याबाबत निर्देश दिले असून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com