Ganesh Naik statement, Eknath Shinde Thane politics,
esakal
मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाचा महापौर नवी मुंबईत झाला. मिरा-भाईंदरमध्ये महापौर बसवला. ठाण्यातील यश थोडक्यात गेले. पण जिल्हा बँक असो वा जिल्हा परिषद सर्वत्र विजय मिळवला. त्यामुळे किल्ले कोणाचे नसतात. आताही पक्षाने जर एक इशारा केला तर यांचे नामोनिशाण पुसून टाकेन, असा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाण्यात केला.