कोकण मंडळाची सोडत यंदा प्रथमच ठाण्यात ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कोकण मंडळाची सोडत यंदा प्रथमच ठाण्यात ?

मुंबई : म्हाडाच्या (Mhada) कोकण (Kokan) गृहनिर्माण (Housing) व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 900 हून अधिक सदनिकांच्या सोडतीची जाहिरात सोमवारी (Monday) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची राजकीय पार्श्वभूमी ठाणे Thane शहराची असल्याने यंदा कोकण मंडळाची सोडत प्रथमच ठाण्यात (Thane) काढण्याची तयारी मंडळाने सुरु केली आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीची घोषणा गृहनिर्माण मंत्र्यांनी केली आहे. त्याप्रमाणे 23 ऑगस्ट रोजी सोडतीची जाहिरात प्रसिध्द होईल. तर 24ऑगस्ट पासून अर्जदारांना अर्ज करता येणार आहेत. म्हाडाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जांची सोडत 14 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. सोडतीची जाहिरात दरवेळी म्हाडा मुख्यालयात किंवा रंगशारदा सभागृह वांद्रे आयोजित करण्यात येते. मात्र यंदा प्रथमच ही सोडत ऑनलाइन पद्धतीने ठाण्यातील कालिदास सभागृहात काढण्याचे नियोजन सुरु आहे.

हेही वाचा: मुंबईसह ठाणे,पालघर मध्ये मुसळधार पावसाचा इशारा

यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार सोडत म्हाडा कार्यालयात काढण्यात येणार होती. परंतु गृहनिर्माण मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी ठाणे असल्याने ठाण्यात सोडत काढण्याचा चर्चा सुरु होती. अखेर कोकण मंडळातील अधिकाऱ्यांनी सोडतीच्या जाहिरातीमध्ये या ठिकाणाचा बदल करण्याचे ठरवले आहे. सभागृहाची तारीख उपलब्ध होताच सोडतीच्या स्थळाचा उल्लेख जाहिरातीमध्ये करण्यात येईल, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Thane Preferred For Mhada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai