ठाणे : रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणालीला हक्काचं घर | Eknath shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath-shinde

ठाणे : रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणालीला हक्काचं घर

ठाणे : रेल्वे अपघातात (railway accident) दोन्ही पाय गमावलेल्या रूपाली मोरे (rupali more) हिला ठाणे पालिकेने (thane municipal corporation) हक्काचे घर दिले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याहस्ते बुधवारी तिच्या हाती घराच्या चाव्या (house possession) सोपविण्यात आल्या.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २५८ नव्या रुग्णांची भर; ४ जणांचा मृत्यू

१४ ऑगस्ट रोजी रूपाली उपनगरी रेल्वेगाडीत चढत असताना धक्का लागून खाली पडली. यात तिला दोन्ही पाय गमवावे लागले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी तिच्या उपचार आणि शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला होता. मानपाडा येथे राहणाऱ्या रूपालीकडे हक्काचे घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी पालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रूपालीला ठाण्यात घरकुल उपलब्ध करून देऊन शिवसेनेने शब्द पाळला असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

loading image
go to top