
Summary
गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकावर कोकणगमनाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
गणेशभक्त तिकिटांसाठी तब्बल २५ तास रांगेत थांबले असूनही जागा मिळण्यात अडचणी येत आहेत.
फलाटावर जत्रेसारखा माहोल निर्माण झाला असून प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे. दरवर्षी कोकणवासीयांसाठी अनेक विशेष गाड्या सोडल्या जातात. मात्र या गाड्यांचं बुकिंग सुरु होताच बंद होत आहे. त्यामुळे इतर गणेभक्तांची गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. गणेशभक्त तिकिटांसाठी २५ तासांपासून रांगेत उभे आहेत. शनिवारी रात्रीच अनेकांनी ठाणे स्थानक गाठले, जेणेकरून रविवारी सुटणाऱ्या गाडीत त्यांना जागा मिळेल. मात्र एवढ्या प्रतीक्षेनंतरही ट्रेनमध्ये जागा मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.