ठाण्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची उच्चांकी नोंद होत आहे. बुधवारप्रमाणे गुरुवारीही जिल्ह्यात नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद करण्यात आली.

ठाणे ः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची उच्चांकी नोंद होत आहे. बुधवारप्रमाणे गुरुवारीही जिल्ह्यात नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद करण्यात आली. जिल्ह्यात दिवसभरात 366 नवीन रुग्णांसह सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा सात हजार 57, तर मृतांचा आकडा 213 झाला आहे. 
जिल्ह्यात ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारप्रमाणे गुरुवारीही सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. पालिका क्षेत्रात सर्वाधिक 155 कोरोना बाधित आढळल्याने बाधितांचा आकडा दोन हजार 605 वर पोहोचला.

महत्त्वाची बातमी  ः  Inside Story : आपल्या शिंकेतून एका सेकंदात इतक्या दूरवर जातो कोरोनाचा विषाणू

नवी मुंबई महापालिकेत 78 रुग्णांची नोंद झाली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 1 हजार 931 तर, मृतांचा आकडा 61 झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत 29 रुग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांचा आकडा 911, तर मृतांचा आकडा 27 इतका झाला. मिरा-भाईंदरमध्ये 28 रुग्णांची नोंद होऊन बाधितांचा आकडा 605 वर गेला आहे. भिवंडीमध्ये तीन रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 105 झाला आहे.

महत्त्वाची बातमी ः मुंबईत उभारले खास कोव्हिड रुग्णालय; 'इतक्या' खाटांची असणार क्षमता
 

उल्हानगरमध्ये 26 रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा 272 झाला. बदलापूरमध्ये 12 रुग्णांच्या नोंदीने बाधितांचा आकडा 204 झाला. अंबरनाथमध्ये 18 रुग्णांच्या नोंदीने बाधितांचा आकडा 103 वर गेला. ठाणे ग्रामीण भागात 17 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 321 झाला. 

 

जिल्ह्यातील रुग्णांची सख्या 
महापालिका क्षेत्र बाधित रुग्ण मयत 
ठाणे महापालिका 155 06
केडीएमसी 29 01 
नवी मुंबई 78 02 
मीरा भाईंदर 28 00 
उल्हासनगर 26 00 
भिवंडी 03 00 
अंबरनाथ 18 00 
बदलापूर 12 00 
ठाणे ग्रामीण 17 00

 

 

thane record highest 155-new corona patients in a single day inthane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane record highest 155-new corona patients in a single day in thane