

Thane Ring Metro Project:
esakal
ठाणे : वाहतूककोंडी, प्रवासासाठीचा वेळ, शहर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रिंग मेट्रो शहरासाठी भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या सुविधेमुळे ठाणेकरांना भिवंडी, कल्याण, नवी मुंबईसह मुंबईला जाता येणार असल्याने रिंगमेट्रो भविष्यातील सुखकर प्रवासाचा रथ ठरणार आहे.
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रिंग मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.