Thane Cancer Hospital : कर्करोग उपचारांसाठी मुंबईची धावपळ कमी होणार; ठाण्यात एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलचे नवे केंद्र सुरू, ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकाच छताखाली

SSO Cancer Hospital Opens Advanced Cancer Treatment Centre in Thane : कर्करोगावरील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करण्यासाठी ठाण्यात एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलचे अत्याधुनिक केंद्र सुरू झाले असून ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकाच छताखाली सेवा देणार आहेत.
 SSO Cancer Hospital Opens Advanced Cancer Treatment Centre in Thane

SSO Cancer Hospital Opens Advanced Cancer Treatment Centre in Thane

Sakal
Updated on: 

ठाणे : कर्करोगाचे निदान झाले की रुग्णांसह संपूर्ण कुटुंबाची उपचारांसाठी धावपळ सुरू होते. कधी तपासण्यांसाठी एका रुग्णालयात, तर कधी शस्त्रक्रिया आणि औषधोपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यात वेळ, पैसा आणि मानसिक त्रासाची भर पडते. मात्र, कर्करोगग्रस्तांची ही फरपट कमी करण्यासाठी आता ठाण्यातच ३० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची फौज सज्ज झाली आहे. एसएसओ कॅन्सर हॉस्पिटल्सने शहरात अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्र सुरू केले असून, निदानापासून शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरच्या पुनर्वसनापर्यंत विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे.

Loading content, please wait...