

मुरबाड : मुरबाड ते कल्याण हा राज्य परिवहन महामंडळाच्या मुरबाड आगारातील सर्वात जास्त उत्पन्न देणारा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. मात्र, एवढी मोठी प्रवासी संख्या असतानाही या मार्गावर पुरेशा एसटी बस गाड्या उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची तक्रार प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे.