

Thane ST Bus Depot repairing Work
ESakal
ठाणे शहर : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी आगारात प्रवाशांची होणारी वणवण आता थांबणार आहे. अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या या आगाराच्या इमारतीची दुरुस्ती करून प्रवाशांसाठी भव्य संरक्षक शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘सकाळ’ने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर एसटी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.