
Mumbai-Ahemdabad Bullet Train
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पातील ठाणे स्थानक हे देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन म्हणून विकसित केले जात आहे. ठाण्यातील बुलेट ट्रेन स्थानक हे रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेटी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके आणि लगतच्या महामार्ग व विशेष रस्त्यांद्वारे विमानतळाशी जोडले जाणार आहे. यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.