ठाणे: विद्यार्थ्यांच्या लघुचित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार; 'पाऊली' खणाणली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paulie short film gets best film award

ठाणे: विद्यार्थ्यांच्या लघुचित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार; 'पाऊली' खणाणली

डोंबिवली : केवळ अभ्यास म्हणून नाही, तर आपण घडविणाऱ्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळून त्यातून सामाजिक संदेशही (social message) घराघरात पोहोचावा यासाठी दोन वर्षे सतत त्यांनी मेहनत घेतली. कोरोना काळात येणाऱ्या आर्थिक अडचणी बरोबरच इतर अडचणींवर मात करीत 'पाऊली' या लघुचित्रपटाची (Paulie short film) निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या या प्रयत्नाला केवळ कौतुकाची थाप नाही तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Dadasaheb Phalke International Film Festival) उत्कृष्ट लघुपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा: विक्रमगडचा आणखी एक विद्यार्थी युक्रेनमध्ये; शासनाकडून मदत नाही

अंधश्रद्धेचे निर्मुलन करण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक असून हेच या लघुचित्रपटाच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न पाऊलीच्या टिमने केला असल्याचे दिग्दर्शक आदित्य फरड यांनी सांगितले. वांगणी येथे राहणाऱ्या आदित्य याने ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातून 2021 साली पदवी शिक्षण पूर्ण केले. फिल्म टेलिव्हिजन अॅण्ड न्यू मिडीया प्रोडक्शन या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असताना 30 मिनिटांचा लघुचित्रपट आम्हाला बनवायचा होता. परंतू हा केवळ महाविद्यालयी अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता तो युश फेस्टिव्हलमध्ये तो प्रदर्शित करेल हे माझे ध्येय्य होते आणि त्यादृष्टीने माझा प्रवास सुरु झाला.

कोरोनाचा काळ असल्याने वांगणी येथे माझ्या गावी या चित्रपटाचे शुटींग करण्याचे ठरविले. मध्यंतरी लोकल सुरु होताच आम्ही गावी गेलो. तेथे चार ते पाच दिवस राहून चित्रपटाचे शूट पूर्ण केले. गावकऱ्यांनीही आम्हाला यामध्ये खूप सहकार्य केले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी माहिती असल्याने डिसेंबर महिन्यात आम्ही आमच्या चित्रपटाचीही माहितीही लघुचित्रपट महोत्सव पुरस्कारासाठी दिली होती. मुंबई मघ्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला असून आमच्या लघु चित्रपटाला उत्कृष्ट लघुचित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा: Maratha Reservation : आपल्या रक्ताचा, घामाचा उपयोग राष्ट्रहितासाठी करा-संभाजीराजे

आमचा हा पहिलाच प्रयत्न होता, त्याला ही कौतुकाची दाद मिळाल्याने यापुढेही सामाजिक विषय घेऊन मराठीतील लघुचित्रपटांची निर्मिती करण्याचा आमचा विचार आहे असे आदित्यने सांगितले. या पुरस्कारासोबतच सोबत गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा, नेक्स्टजीएन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, इत्यादी महोत्सवात देखील या लघुपटाने आपलं नाव कोरलं आहे. 25 ते 30 जणांची आमची पूर्ण टिम असून सर्वांच्या मेहनतीचे फळ म्हणून आज पाऊली चित्रपटाला हा नामांकीत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

याचे लेखन नचिकेत दांडेकर यांनी केले असून संगती कुशल इनामदार यांनी दिले आहे. टिममधील नचिकेत दांडेकर, अभिजित दळी हे डोंबिवलीकर असून त्यांचा नुकताच शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सत्कार केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना यापुढे काही मदत लागल्यास ते पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मोरे यांनी यावेळी दिले.

काय आहे पाऊली लघुचित्रपट ?

असे म्हंटले जाते की, जिथे अंधश्रद्धा असते तिथे शिक्षण कधीच असू शकत नाही आणि जिथे शिक्षण असतं तिथे अंधश्रद्धा कधीच टिकत नाही. पण अंधश्रद्धेचं निर्मलून करायचं असेल तर शिक्षण खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. अंधश्रद्धेमुळे सुरू होणारा शिक्षणाचा प्रवास म्हणजे 'पाऊली' हा लघुपट आहे. शिक्षणाचे महत्त्व या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे आदित्य सांगतो.

Web Title: Thane Students Paulie Short Film Got Best Film Award In Dadasaheb Phalake International Film Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top