esakal | मुंबई : दहिसरमध्ये तीन घरं कोसळली; एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Dahisar house collapsed

मुंबई : दहिसरमध्ये तीन घरं कोसळली; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : शहरात मालाडमधील (Malad) मालवणी भागात बुधवारी एक रहिवासी इमारत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेनंतर आज (गुरुवार) आणखी तीन घर कोसळल्याचं वृत्त आहे. दहिसर (Dahisar) येथील या दुर्घटनेत एकाचा मृत्यूही झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. (Thane Three houses collapsed in Dahisar Death of one person)

एएनआयच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव प्रद्युम्न सरोज असं आहे. दहिसर ईस्ट येथील शिवाजीनगर भागातील लोखंडी चाळ येथे ही घटना घडली. पावसामुळं तीन घर कोसळल्यानं हा अपघात झाला.

शहरातील मालाड येथील मालवणी भागात इमारत कोसळल्याप्रकरणी रफीक सिद्दीकी, रमजान शेख या दोघांवर गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालाडमध्ये निवासी इमारत कोसळली होती. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत.