
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताला सोमवारी (ता.१६) एक आठवडा पूर्ण होत आहे. या दुर्घटनेत चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर नऊ प्रवासी जायबंदी झाले आहेत. एका धोकादायक वळणावर गर्दीने खचाखच भरेलेल्या दोन लोकल विरुद्ध दिशेने एकमेकांजवळ आल्याने ही दुर्घटना घडली.