

Thane Traffic Diversion
ESakal
ठाणे शहर : ठाणेकरांसाठी कायमच वाहतूक कोंडीचा विषय ठरणाऱ्या घोडबंदर रोडची शुक्रवार (ता. ८)पासून पुन्हा एकदा ‘परीक्षा’ पाहायला मिळणार आहे. ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ८ ते १० मेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. परिणामी, ब्रह्मांड, मानपाडा, कापूरबावडी तसेच घोडबंदर रोड परिसरात वाहनांच्या रांगांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.