

Thane Traffic Route Changes for 6 months
Esakal
ठाणे : बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी वाहतूक विभागाने मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी रस्त्यावरील वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. पुढील सहा महिने हा बदल असणार आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.