
Thane: महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी (ता. २६) रात्री बारा ते शुक्रवार (ता. २७) रात्री बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.