
Thane Latest News: माजिवडा पुलापासून सुरू झालेला ठाणे-वडपे महामार्ग लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे वडपे हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. त्यातील १३ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे.
माजिवडा ते साकेत पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दहा-पंधरा दिवसांत नाशिककडे जाणाऱ्यांना तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद, नवी मुंबईतून माजिवडामार्गे नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडीचा तिढा सुटणार आहे.