
डोंबिवली : पावसाळा सुरु झाला की पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचे, भटकंतीचे वेध लागतात. कल्याण जवळील श्री मलंग पट्ट्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या तावली पर्वतावर पर्यटक दरवर्षी येतात. मात्र पर्वतावरील वाटा माहित नसल्याने ते मार्ग चुकून भ्रकटतात. मंगळवारी मुंबईतील चार पर्यटक असेच फिरण्यासाठी तावली डोंगरावर गेले आणि वाट चुकल्याने हरवले. त्यांनी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या 112 या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. हिललाईन पोलिसांनी याची माहिती मिळताच नेवाळी बिट चौकीतील पथ काने क्षणाचाही विलंब न लावता पर्यटकांचा शोध घेण्यास सुरवात केली. पोलिसांच्या पथकाने अवघ्या 5 तासात मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने या चौघाचा शोध घेत त्यांची सुखरूप सुटका केली.