esakal | परमबीर सिंह यांनी सेकंड हँड मोबाइल का घेतला? फेसटाइम ID वरुन आरोपींच्या संपर्कात?
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीरसिंह, माजी पोलिस आयुक्त

परमबीर सिंह फेसटाइम ID वरुन आरोपींच्या संपर्कात?

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा अँटिलिया प्रकरण (antilia case) आणि मनसुखच्या हत्येच्या कटाशी संबंध असल्याचा संशय अधिकच गडद होत आहे. एनआयएने (NIA) थेट आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंह यांचे नाव घेतले नाही. मात्र, त्यामध्ये असे अनेक पुरावे जोडले आहेत ज्यामुळे परमबीर सिंह संशयाच्या भोवऱ्यात अडकू शकतात.

हेही वाचा: 'त्या' दिवशी परमबीर सिंह यांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमबिरसिंह हे अटक आरोपींशी फेसटाइम आयडी वापरून संपर्कात होते, असा आरोप केला जात आहे. त्या 'फेसटाइम' आयडीचे पहिले नाव कुरकुरे आणि आडनाव बालाजी होते. तपासादरम्यान, एनआयएला गुगल खात्याबद्दल माहिती मिळाली जी 'फेसटाइम' चालविण्यासाठी वापरली गेली होती. त्याच 'फेसटाइम' आयडीचा वापर आरोपींशी संवाद साधण्यासाठी केला गेला होता.

एनआयए तपासात आरोपी Google खात्याचा वापर करून 'फेसटाइम' चालवित होते. ISE####@gmail.com या खात्याशी कोणाचा फोन जोडलेला आहे आणि त्याचे नाव काय आहे हे शोधण्यासाठी Apple कंपनीच्या कायदेशीर कंपनीशी संपर्क साधला. यावेळी ज्या गोष्टी समोर आल्या त्याच गोष्टी परमबीरसिंह यांच्या जवळच्या व्यकीच्या चौकशीतून समोर आल्याची माहिती आहे. तपासात ज्या दोन व्यक्तींची नावे समोर आली. त्यावरून परमबीरसिंह यांच्याविरोधात संशय आणखी बळावला.

परमबीरसिंह हे जेव्हा डीजी होमगार्ड झाले, त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याकडे एक जुन्या आयफोनची मागणी केली. त्यानुसार त्या अधिकाऱ्याने सिताबे खान यालाल काही आयफोन मोबाइल घेऊन बोलावले. त्याने आणलेल्या मोबाइलमधील एक मोबाइल परमबीरसिंह यांनी निवडला. मात्र, परमबीर या़ंच्या केबीनमध्ये नेटवर्क नसल्याने खान मोबाइल घेऊन बाहेर आला आणि मोबाइल त्या अधिऱ्याला दिला. त्या अधिकाऱ्याने आयडीसाठी पहिले नाव 'कुरकुरे' आणि आडनाव 'बालाजी' ठेवले. कारण, त्यावेळी तो अधिकारी बालाजी कुरकुरे खात होता. नाव लक्षात राहण्याच्या हेतूने ही नाव दिल्याचे अधिकारी सांगत असला, तरी आता त्याचे पासवर्ड माहित नसल्याचे त्या अधिकऱ्याने जबाबात सांगितले.

तपासादरम्यान एनआयए आणखी एका संशयित आरोपीच्या मागावर असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण तपासादरम्यान एनआयएला एक संशयित ईमेल आयडी सापडला. याच ईमेल आयडीचा वापर आरोपी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करत असल्याचा संशय एनआयएला आहे, असा एनआयएने 8 जुलै रोजी Apple इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ईमेल पाठवाला. त्यावर अॅपलने 20 जुलै रोजी एनआयएला एक माहिती दिली. ही माहिती कळताच एनआयएला धक्का बसला. अॅपलने सांगितले की, ते ज्या ईमेल आयडीबद्दल बोलत आहेत. त्याचे पहिले नाव 'कुरकुरे' आणि आडनाव 'बालाजी' आहे. हे वाचल्यानंतर एनआयएला परमबीरच्या जवळच्या एका अधिकाऱ्याच्या व्यक्ती खर सांगत असल्याची ओळख पटली.

दरम्यान, जबाबात अधिकाऱ्याने दोन ईमेल आयडी p###@hotmail.com आणि p####@gmail.com याची माहिती दिली होती. पण तपासात ise####@gmail.com या मेल आयडीचा वापर आरोपीनी संपर्क साधण्यासाठी केला होता. याच पुराव्याच्या आधारावर परमबीर सिंह हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. तसेच एनआयएकडे ठोस पुरावे नसल्याने एक संशयित व्यक्तीचा उल्लेख करणं एनआयएनं टाळलं आहे. याबाबत परमबीर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांचा फोन बंद येत आहे.

loading image
go to top