esakal | 'त्या' दिवशी परमबीर सिंह यांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा
sakal

बोलून बातमी शोधा

encounter specialist pradeep sharma

'त्या' दिवशी परमबीर सिंह यांच्या केबिनमध्ये होते प्रदीप शर्मा

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मनसुख हिरेन (Mansukh hiren) ज्या दिवशी बेपत्ता झाले, त्या दिवशी परमबीर सिंह (Parambir singh) यांच्या केबिनमध्ये प्रदीप शर्मा (pradeep sharma) उपस्थित होते, अशी माहिती आता समोर आली आहे. वाजेनेच मनसुख हिरेन बेपत्ता झाल्याची आणि त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे आढळल्याची बातमी प्रथम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली होती.

इतर अधिकारी आयुक्तांच्या केबिनमध्ये पोहचण्यापूर्वीच वाजे थेट आयुक्तांना ही माहिती सांगण्यासाठी गेला. त्यावेळ निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्माही तेथे उपस्थित होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेल्यानंतर, प्रदीप शर्मा हा आयुक्तांच्या केबिनमधून बाहेर पडत होता.

हेही वाचा: IAF साठी मोठा दिवस, बराक-८ चीन-पाकिस्तानला हवेतच देणार जोरदार प्रत्युत्तर

'त्या' महिलेचा सचिन वाजे ग्राहक होता,

सचिन वाजेसोबत (Sachin waze) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाताना दिसलेल्या महिलेचं गुढ अखेर उकललं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रातून या महिलेबद्दलची माहिती समोर आलीय. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia bomb scare) आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiran murder case) मुख्य आरोपी असलेला सचिन वाजे सध्या तुरुंगात आहे. सचिन वाजे या महिलेचा ग्राहक होता. मागच्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सचिन वाजे या महिलेला खर्चासाठी म्हणून महिन्याला ५० हजार रुपये देत होता.

हेही वाचा: अफगाणिस्तान संकट: अजित डोवाल यांनी रशिया समोर स्पष्ट केली भारताची भूमिका

सचिन वाजेने या महिलेला त्याने स्थापन केलेल्या एका कंपनीचे संचालकही बनवले होते. या कंपनीच्या खात्यात १.२५ कोटी रुपये कुठून आले? त्या पैशांचा स्त्रोत काय होता? ते माहित नसल्याचे या महिलेने NIA अधिकाऱ्यांना चौकशीत सांगितले. सचिन वाजेला सर्वप्रथम आपण २०११ साली भेटल्याचे महिलेने तिच्या जबानीत म्हटले आहे. जून २०२० मध्ये पोलीस दलता रुजू झाल्यानंतर वाजेने चांगले उत्पन्न मिळत असल्याने या महिलेला एस्कॉर्ट म्हणून काम थांबवायला सांगितले, असे या महिलेने तिच्या जबानीत सांगितले.

loading image
go to top